शेतमालाची चोरी करणार्‍या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

The crime branch team arrested three persistent thieves who were stealing farm produce

The crime branch team arrested three persistent thieves who were stealing farm produce
        बुलढाणा न्यूज: जळगाव जामोद व शेगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतमालाची चोरी करणार्‍या तीन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आली.

The crime branch team arrested three persistent thieves who were stealing farm produce
         जळगाव जामोद तालुयातील अकोला खुर्द येथील रहिवासी योगेश लक्ष्मण जोशी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार मागील ८ जुलै रोजी आसलगाव रोडवरील बुलडाणा अर्बनचे गोदाम फोडून चोरट्याने त्यातील १ लाख ७८ हजार ५०० रुपये किंमतीची १७ क्विंटल तूर चोरुन नेली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला. तसेच शेगांव तालुयातही शेतमाल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
     

       सतत शेतमाल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. शेतमाल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्वतः तपास पथके तयार केली. पथकाने तपास करुन संग्रामपूर तालुयातील आरोपी अर्जुन श्रीकृष्ण हनवते (वय ३२), आकाश संतोष वानखडे व अविनाश बाळकृष्ण मेहंगे (वय २४) या तीन चोरट्यांना सोमवार, दि.१६ सप्टेबर २०२४ रोजी अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपये किंमतीचे मालवाहू वाहन जप्त केले आहे.

    शेतमाल चोरीच्या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून पोलिस त्या आरोपींचा शोध घेत आहेत. यावेळी आरोपीची चौकशी केली असता त्यांनी चार गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस निरीक्षक रूपेश शक्करगे, आशिष चेचरे, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, चांद शेख, राजू टेकाळे, ऐजाज खान, पो.ना.गणेश पाटील, पोकॉ. अजीस परसुवाले, चालक पोहेकॉ. विजय मुंढे, शिवानंद हेलगे यांनी केली आहे.

 

आज मुख्यमंत्री शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें