आज मुख्यमंत्री शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

Buldhana district tour of Chief Minister Shinde today

बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

          बुलढाणा न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde) हे आज गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर येणार असून आहेत.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी १२.२० वाजता एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅड येथे आगमन करतील व मोटारीने कार्यस्थळी प्रयाण करतील. दुपारी १२.३० वाजता बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहणार असून दुपारी १ वाजता राखीव वेळ आहे. दुपारी १.१५ वाजता मोटारीने शारदा ज्ञानपीठ हायस्कुल, बुलढाणाकडे प्रयाण करुन दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम ( Promotion and dissemination program of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana) व इतर महापुरुष व संतांचे पुतळयाचे ई अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. स्थळ शारदा ज्ञानपीठ शाळेचे मैदान, बुलढाणा. दुपारी ३.३० वाजता मोटारीने एमएसआरटीसी वर्क शॉप मागील हेलीपॅड बुलढाणाकडे प्रयाण करुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

 

१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा

शेगाव पोलीसांनी तीन चोरटे पकडले

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करा :  अ‍ॅड.जयश्री  शेळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें