विदर्भ विभाग प्रभारी कुणाल चौधरी यांची विशेष उपस्थिती

बुलढाणा न्यूज : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष अॅक्शन मोडवर आला असून राज्यात काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यप्रभारी यांनी स्थापित केलेल्या समित्या जिल्हानिहाय आढावा घेत आहे. बुलढाणा जिल्हयातही सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा काँग्रेसची विधानसभानिहाय विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे विदर्भ विभाग प्रभारी कुणालजी चौधरी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली , विभागीय समन्वयक आमदार धिरजजी लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी दोन वाजता आ.लिंगाडे यांचे जनसंपर्क कार्यालय संगम चौक बुलढाणा येथे ही बैठक पार पडणार आहे.
दुपारी तीन ते पुढील वेळात जळगांव जामोद, सिंदखेडराजा, मेहकर, खामगांव, मलकापुर, चिखली व बुलढाणा या क्रमानुसार विधानसभा मतदार संघनिहाय चर्चा राहणार असून काँग्रेस पक्षाची बांधणी व संघनात्मक पातळीवरची नवीन ध्येय धोरणे या बैठकीत आखली जाणार आहे. नुकतीच काँग्रसेची अकोला-बुलढाणा-वाशिम जिल्ह्यांची विभागीय आढावा बैठक बुलढाणा येथे पार पाडली. त्यानंतर लगेच काँग्रेसची विधानसभानिहाय बैठक होत असल्याने ही बैठक महत्वाची असल्याचे दिसून येत आहे.
१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा
शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर- जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके
नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहिर करा : अॅड.जयश्री शेळके