दोन दिवसीय प्रशिक्षणातून तीस महिलांना लाभ
बुलढाणा न्यूज : अफार्म संस्था, पुणे व सामाजिक क्रांती बहुउद्देशिय संस्था,सातगाव म्हसला यांच्या वतीने दहीद ता.बुलढाणा येथे बचत गटातील तीस महिलांना मिलेट मिशन कार्यक्रम 2024-25 अंतर्गत पौष्टिक तृणधन्या पासून विविध पाककलेचे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमात जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. बचत गटातील निवड केलेल्या तीस महिलांनी तयार केलेल्या पदार्थाची पॅकिंग व मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी श्रीपाल सोनटक्के ब्लॉक मिशन मॅनेजर msrlm तसेच प्रकल्प संचालक आत्मा येथील गजानन इंगळे तसेच मा.वंदना टेकाळे यांनी तयार केलेले पदार्थ यांची पॅकिंग कशी करायची याविषयी सर्व महिलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करता येते असा अनुभव त्यांनी व्यक्त केला आणि मिलेट पासून तयार केलेले खाद्य पदार्थ याची प्रदर्शनी मांडून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पालकर यांनी मानले. तसेच योग्य त्या दरात पदार्थाची विक्री सुद्धा करण्यात आली .
देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्यास पकडले
१० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा