आरोपींकडून २७७० रुपये रोख व एक मोबाईल जप्त
बुलढाणा न्यूज
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे सर तसेच बीबी महामुनी अपर पोलीस अधीक्षक ,बुलढाणा, अशोक थोरात खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशानुसार मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन शेगाव शहर पोलीसांनी
कलम 303(2) बीएनएस प्रमाणे तीन आरोपींना ताब्यत घेतले असून त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेली रोख 2 हजार 770 रुपये व एक मोबाईल फोन किंमती 12 हजार असा एकूण 14 हजार 710 मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पथकातील सहाय़यक पोलीस निरिक्षक आशिष चेचरे, हे.कॉ. एजाज खान, पो.कॉ.अमोल शेजोळ, पो.कॉ.अजिस परसुवाले, चालक पो.कॉ.शिवानंद हेलगे यांनी केली आहे.
पोलीसांनी पकडलेल्या तीन आरोपीताकडून अजून काही गुन्हयाची उकल होवू शकते
देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्यास पकडले
शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर- जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके