आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त
बुलढाणा न्यूज : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे.
असे झाले अर्ज प्राप्त
मेहकर तालुक्यात 42 हजार 959 अर्जापैकी 42 हजार 956,
बुलढाणा तालुक्यात 38 हजार 802 अर्जापैकी 38 हजार 799,
लोणार तालुक्यात 25 हजार 661 अर्जापैकी 25 हजार 657,
खामगाव तालुक्यात 47 हजार 620 अर्जापैकी 47 हजार 607,
संग्रामपूर तालुक्यात 23 हजार 206 अर्जापैकी 23 हजार 198,
चिखली तालुक्यात 42 हजार 630 अर्जापैकी 42 हजार 613,
नांदुरा तालुक्यात 25 हजार 225 अर्जापैकी 25 हजार 211,
शेगाव तालुक्यात 21 हजार 412 अर्जापैकी 21 हजार 400,
देऊळगाव राजा तालुक्यात 18 हजार 275अर्जापैकी 18 हजार 256,
जळगाव जामोद तालुक्यात 24 हजार 49 अर्जापैकी 23 हजार 994,
सिंदखेड राजा तालुक्यात 29 हजार 54 अर्जापैकी 28 हजार 971,
मोताळा तालुक्यात 24 हजार 189 अर्जापैकी 24 हजार 113,
मलकापूर तालुक्यात 23 हजार 999 अर्जापैकी 23 हजार 923 अर्जांची छाननी तालुकास्तरावर पूर्ण करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 3 लाख 87 हजार 81 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. तालुकास्तरावर 3 लाख 69 हजार 507 अर्ज स्विकृत करण्यात आले. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे दाखल करण्यात आलेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईनरित्या दाखल करण्यात येत आहे. ऑनलाईन दाखल सर्व अर्जांची तालुकास्तरावर छाननी करण्यात येते आहे.
तालुकास्तरावर स्विकृत करण्यात आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरावर येणार आहे. यात अर्जाची जिल्हास्तरावरील समितीतर्फे पडताळणी होणार असून त्यानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आहे.