Shiv Sena chief Uddhav Thackeray’s birthday should be celebrated with social activities – Shiv Sena District Chief Jalander Budhwat

बुलढाणा : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena party chief and former Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.
शिवसेना ही सत्तेसाठी नसून कायम समाजासाठी कार्यरत असते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा तत्व दिले आहे. त्याच आधारावर शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने उद्धव साहेबांची साथ दिली आहे. शेतकर्यांना विना अट, विना कागदपत्र थेट दोन लाखापर्यंत कर्जमाफी मा.उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना दिली. त्यानंतर कोरोना काळामध्ये कुटुंबप्रमुख या नात्याने महाराष्ट्र सांभाळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याची नोंद घेण्यात आली.
येत्या शनिवार, दि.27 जुलै रोजी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वांनी आपआपल्या तालुक्यात, शहरात, गावात सामाजिक उपक्रम जसे की, रुग्णांना फळ वाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, रक्तदान शिबिर, अन्नदान व इतर सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा,असे आवाहन Shiv-Sena-District-Chief-Jalander-Budhwat शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त