चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साथरोगांबाबत जनजागृती

बुलढाणा न्यूज – दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप डेंग्यु, चिकनगुनिया, हत्तीरोगासह अन्य कीटकजन्य आजारांविषयी चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या धाड व इतर गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.

          बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराजसिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र सरपाते यांच्या आदेशान्वये व डॉ.वैभवी क्षीरसागर, डॉ.सुयोग राजपूत, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र चांडोळ यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ अंतर्गत येणार्‍या धाड व इतर गावांमध्ये कीटकजन्य आजार, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग व इतर आजारांबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये कंटेनर सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण,गप्पी मासे सोडणे, नाल्या वाहत्या करणे, साचलेल्या पाण्यावर ऑइल टाकणे व एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत व डासांची उत्पत्ती थांबविण्यात बाबत चांडोळ वासियांना सुचना देण्यात आल्या.
     यावेळी एस.एन.अहिर, डी.एन.इंगळे आरोग्य सहाय्यक, विपिन राजपूत प्र.वै.अधिकारी, पी.बी.पवार आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांना हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें