बुलडाणा न्यूज : जिल्हा सैनिक कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने तीन पदांवर नियुक्ती करण्यत येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभामंडप मॅनेजर हे 1 पदा फक्त माजी सैनिक जेसीओ, सफाई कर्मचारी 1 पद माजी सैनिक, सिव्हिलीयन, आणि चौकीदार हे 1 पद माजी सैनिकांमधून भरण्यात येणार आहे. सदर पदांकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी दि. 14 जून 2024 पर्यंत डिस्चार्ज बुक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र. एम्पलायमेंट कार्ड आणि वैयक्तिक अर्जासह जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत.
सभामंडप व्यवस्थापकासाठी दहावी पास, वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत, महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनीटास किमान 40 शब्द असावा. यासाठी 24 हजार 79 रूपये मानधन देण्यात येणार आहे. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड, मेडीकल कॅटेगरी ही शेप-1 असावी लागणार आहे. सफाई कर्मचारी हा दहावीपर्यंत शिक्षित आणि वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत असावी. यासाठी 12 हजार 90 रूपये मानधन देण्यता येणार आहे. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड, मेडीकल कॅटेगरी ही शेप-1 असावी लागणार आहे. चौकीदार पदासाठी दहावीपर्यंत शिक्षण आणि वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत असावी लागणार आहे. तसेच 19 हजार 992 रूपये मानधन देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.