लाखो झाडे लावण्याचा पर्यावरण ग्रुपने केला संकल्प

       बुलडाणा- सर्वत्र मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे यंदादेखील बुलडाणा पर्यावरण ग्रुपने लाखो झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. शहरातील रस्त्याच्या दुतर्फाला लावलेल्या झाडाभवतींचा कचरा व प्लास्टिक जमा करण्यात आले व झाडाभोवती आळे करण्यात आले.
       पावसाळ्यात या झाडांभावेती पाणी मुरुन झाडाची वाढ होईल, तसेच छोट्यारोपट्या भवती असलेले गाजर गवत काढून छोटी रोपटी मोकळी करण्यात आली. तसेच हवेमुळे वाकलेल्या झाडांना बांबू बांधून आधार देण्यात आला. तसेच मागील वर्षी लावलेल्या झाडांची निगा राखणे व त्या झाडाना आळे करून त्यातील गाजर गवत काढून छोट्या रोपाभवती स्वच्छता करत प्लास्टीक गोळा करण्यात आले. या पर्यावरण प्रेमिनी बुलढाणा शहर पुढील काळात हिरवेगार करण्याचा संकल्प केला असून त्यासाठी युद्ध पातळीवर या ग्रुपने कार्य सुरु केले आहे.

      यावेळी पर्यावरण मित्र प्रदिप डांगे, मुकुंद वैष्णव, मुकुंद जोशी, कल्पना माने, संगीता पंजाबी, प्रिती डांगे, दीपक पाटिल, चंद्रकांत काटकर, जयंत दलाल, सार्थक डांगे, सुधाकर मानवतकर यांचेसह पर्यावरण मित्र यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें