बुलढाणा जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने चिखली येथे बुध्द-भिम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन

        बुलढाणा-  तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि.31 मे 2024 रोज सायंकाळी 6 वाजता चिखली येथील नागसेन बुध्दविहाराचे प्रांगणात गायक मेघानंद जाधव यांचा बुध्द-भिम गीतांच्या गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासने तर अध्यक्षस्थानी आमदार सौ.श्वेताताई महाले असणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये पी.एस.डी.सी.म.विद्याधर महाले, नागसेन बुध्दविहार समितीचे अध्यक्ष गुलाबराव मोरे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा

ध्यक्ष प्रताप मोरे, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, पत्रकार सुधीर चेके पाटील, व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिध्देश्वर पवार, पत्रकार हिम्मतराव जाधव, समाजसेवक प्रशांत डोंगरदिवे, पुरोगामी पत्रकार संघाचे विदभ अध्यक्ष किरण मोरे, रा.कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, संपादक सौ.स्वातीताई वानखेडे,  डॉ.सौ.ज्योतीताई खेडेकर,  भारत जाधव, मेजर एकनाथ बोर्डे, चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील, वंचित आघाडीचे अर्जुन बोर्डे, युवा जिल्हाध्यक्ष सतिष पैठणे, वंचित आघाडीचे सतिष पंडागळे, स्वाभिमानी रि.पा.इ.चे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ पैठणे, माजी सरपंच दादाराव सुरडकर,शाळा समितीचे अध्यक्ष सर्जेराव गवई, मुख्याध्यापक एस.एस.गवई, वंचितचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे, समाधान ताजने, विनोद कळसकर, पंचशिल बुध्दविहार समितीचे अध्यक्ष व्ही.ए.काके,  सिध्देश्वर गवई हे राहणार आहे.

 

    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार रणजितसिंह राजपूत  करणार आहे. तरी गीतांच्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष  पत्रकार विष्णु कंकाळ व पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें