बुलढाणा न्यूज : इंडिया आघाडीचे संयोजक तथा घटक पक्ष असलेल्या समाजवादी जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.कपिल पाटील यांची आज 23 मार्च 2024 रोजी मुंबई स्थित लोकभारतीच्या संपर्क कार्यालयात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत यशवंतराव पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष बैरवार,
विदर्भ प्रदेशाध्यक्ष असलम शाह, जिल्हाध्यक्ष योगेश कोकाटे यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते.
वर्तमान सामाजिक व राजकीय परिस्थितीवर एक तास झालेल्या चर्चेतून बुलढाणा लोकसभेची सविस्तर माहिती आमदार कपिल पाटील यांनी जाणून घेतली. लोकसभेसाठी प्रबळ विजयी उमेदवार म्हणून असलेल्या नावाची शिफारसही अँड.रोठेंनी केल्याचे विश्वसनीय माहिती समोर आहे. परंतू शिफारस केलेल्या त्या लोकसभेच्या उमेदवाराचे नाव अद्याप कळू शकले नाही.