32 मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान करण्याबाबत जनजागृतीवर भर
बुलढाणा न्यूज : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 70च्या वर नेण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येतील. यात प्रामुख्याने मतदानाच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 32 मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणुकीशी संबंधीत कामकाजांना वेग देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मृत्यू झालेले आणि इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची प्रामुख्याने 18 ते 19 वयोगटातील युवकांची नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. युवकांनी मतदार नोंदणी करून मतदानासाठी पुढे यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
अशी आहे आकडेवारी
सध्या नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये 18 ते 19 वयोगटातील 27 हजार मतदार आहेत.
सुमारे 29 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सुमारे 20 लाख मतदार नोंदणी झाली आहे.
जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर हे 934 आहे.
नोंदणी करण्यासाठी अद्यापही संधी आहे.
66 हजाराहून अधिक नोंदणी झालेल्या आहे.
जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्र राहणार आहे.
100 ठिकाणी चार हून अधिक मतदान केंद्र एकाच ठिकाणी राहणार आहे.
आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.
नागरी भागात 66 तर ग्रामीण भागात 54 मतदान केंद्र आदर्श बनविण्यात येणार आहे.
72 मतदान केंद्र युवा अधिकारी-कर्मचारी, तर 36 मतदान केंद्र महिला अधिकारी-कर्मचारी हाताळणार आहेत.
तसेच काही ठिकाणी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र सांभाळणार आहे.
सुमारे 1 हजार 200 मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.