बुलढाणा – मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील रहिवासी माया सुरेश जाधव (मुंबई) यांची मुलगी दिवंगत शीतल सचिन झोटे- जाधव जमुना नगर जालना हिचे दि. 22 जानेवारी 2023 रोजी दुर्दैवी घटनेत निधन झाले होते. तिचा प्रथम स्मृतिदिनाचा योग साधून इतरत्र खर्च न करता दान परमिता हा बुध्दधम्माचा संंदेश घेवून जाधव कुटूंबांनी स्वागत बालक आश्रम कांदिवली (प) मुंबई येथील विध्यार्थ्यांना शीतल हिच्या स्मृतिप्रित्यर्थ तिचे आई, बाबा माया सुरेश जाधव,भाऊ अॅड. अनिकेत सुरेश जाधव, बहिण/जीजाजी स्वाती वैभव बनसोडे यांच्या तर्फे भोजन दान तसेच शालेय साहित्य वह्या पुस्तके स्वागत बालक आश्रमात वाटप करण्यात आले.
यानंतर दादर चैत्यभूमीवर शीतल ही च्या स्मृतिप्रीत्यर्थ विधवत पूजा करून भंते यांना फलोहार व धम्म दान देण्यात आले. या प्रसंगी व्ही.जी.जाधव, नारायण म्हस्के, पत्रकार बाबासाहेब जाधव, विमल बाबासाहेब जाधव, सुभाष जाधव, पुष्पा सुभाष जाधव, पप्पू उर्फ शिवराम काळे, पुष्पा शिवराम काळे, सुभाष कस्तुरे, विजया सुभाष कस्तुरे, सचिन कस्तुरे , रामेश्वर जाधव, सुधाकर उबाळे, प्रविण उबाळे,हर्षदिप विद्याधर जाधव, उमेश जाधव यांची उपस्थिती होती.