माफसु येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
बुधवार, दि.6.12.2023 रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैलचित्राला व संचालनालय विस्तार शिक्षण येथील प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संचालक संशोधन तथा कुलसचिव डॉ नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण तथा अधिष्ठाता (निम्नशिक्षण) डॉ.अनिल भिकाने, अधिष्ठाता (मत्स्य) डॉ.सचिन बोन्डे, नियंत्रक (वित्त व लेखा) श्रीमती मनीषा शेंडे, विद्यापीठ अभियंता श्रीमती प्रतिभा वानखेडे, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आरजू सोमकुंवर, विद्यापीठ ग्रंथपाल सुनील गावंडे, परीक्षा नियंत्रक डॉ.भूषण रामटेके, उपकुलसचिव (आस्था) डॉ.अजय गावंडे, उपकुलसचिव (शिक्षण) डॉ.जितेंद्र वाघाये, मा.कुलगुरू महोदयांचे खासगी सचिव डॉ.वकार खान, मा. कुलगुरू महोदयांचे तांत्रिक अधिकारी डॉ.अतुल ढोक, तांत्रिक अधिकारी डॉ संजय गोडबोले, डॉ गिरीधर शेंडे, तांत्रिक अधिकारी व अध्यक्ष, कास्टट्राईब माफसु कर्मचारी संघटना डॉ प्रज्ञेय ताकसांडे, डॉ. गीतांजली ढुमे, सहाय्यक नियंत्रक (वित्त) रामराव कीर्तने, संचालक विस्तार शिक्षण यांचे स्वीय सहाय्यक व उपाध्यक्ष, कास्टट्राईब माफसु कर्मचारी संघटना श्री.प्रवीण बागडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.