स्वयं सहाय्यता महिला बचत गटांनी उद्योजक व्हावे- मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन
Self-help women self-help groups should become entrepreneurs – Chief Ganesh Pandey’s appeal
बुलढाणा न्यूज – नगर परिषद बुलढाणा अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध क्षमता बांधनी आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज महिला सक्षम होत असून बँकेच्या माध्यमातून तसेच अंतर्गत कर्जाच्या भरवश्यावर महिला स्वत:चा छोटा मोठा व्यवसाय त्यांचा सुरु आहे. परंतु महिला बचत गटांनी यावर समाधानी न राहता उद्योजक बनून अनेक महिलांना रोजगार द्यावा, असे आवाहन सोनचीरेय्या शहर उपजीविका केंद्रच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या स्टॉल प्रदर्शनी केंद्राचे उदघाटन प्रसंगी केले. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंचा स्टॉल प्रदर्शनी व विक्री केंन्द्राच्या बुधवार, दिनांक 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन समोर आयोजित करण्यात आले होते.
पुढे बोलतांना मुख्याधिकारी गणेश पांडे म्हणाले की , गटातील महिलांनी बाजारपेठेचा विचार करून आपल्या गटातील वस्तूची गुणवत्ता चांगली ठेवून त्याचे पॅकेजिंग उत्कृष्ट करावे अश्या सूचना प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेल्या महिला बचत गटांना दिल्या. तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या मार्फत भविष्यात अजून महिला बचत गटांसाठी आपण सर्व मिळून काम करू असे ही ते म्हणाले.
तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी गटाला भेटी देवून शासनाच्या झचऋचए योजने मधून गटाला उद्योजक होण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
या प्रदर्शनी व विक्री मध्ये महिलांनी तयार केलेले दिपावलीचे विविध प्रकारचे फराळ ,आवळा पासून तयार केलेले पदार्थ, रेडीमेड गारमेंट ,साडी दुकानचा व्यवसाय सुरु केला होता.
यावेळी शहरातील अनेक महिला बचत गट, नागरिक यांनी प्रदर्शनी ला भेट देवून खरेदी सुद्धा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दिगंबर साठे, वैशाली गायकवाड, नाजीया परवीन, महेंद्र सोभागे, सविता दाभाडे, प्रणाली तायडे ,पूनम पाटील,नलिनी लंकेश्वर, रुबिना परवीन यांनी विशेष सहकार्य केले.