रायपूर पोलीसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आठ हजार रुपयाचा मद्यसाठा जप्त


         बुलढाणा न्यूज – पिंपळगाव सराई, घटनांद्रा, धासाळवडी, साखळी खुर्द या ठिकाणी ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 असून त्यामध्ये जनतेतून थेट सरपंच व इतर सदस्य यांची निवडणूक करिता आज रविवार, दि.5 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी, देशी दारुचा अवैध साठा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
         

         कोणत्याही निवडणूकमध्ये प्रचार हे वेग वेगळ्या पद्धतीची ठरलेल्या असतात. त्यातच निवडणुकीची संधी साधून ग्रामीण भागात अवैध धंदे करणारे देखील ह्याच संधीचा फायदा घेत असतात. या बाबीला घेरुन रायपूर पोलीस ठाणेदार यांनी यावेळी त्यांची टीम बनवून सदर ग्राम पंचायत निवडणूक शांतता पूर्वक पार पाडण्यासाठी नियोजन मागील काही दिवसात अवैध धंदे करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यामध्ये शनिवार, दि. 4 नोव्हेंबर 2023 रोजी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना माहिती मिळाली की निवडणूक अनुषंगाने काही ठिकाणी दारूचा अवैधसाठा होत आहे. त्यावरून ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी चमू बनवून साखळी खुर्द, पांगरी, ढसाळवाडी येथे हातभट्टी , देशी दारूचे बॉक्स पकडुन एकूण तीन केसेस करून आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. या साठेबाजावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईमुळे ऐन निवडणूक अनुषंगाने दारू विक्री करणारे यांचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

      ही कारवाई पोलीस निरिक्षक दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बस्टेवड, सहाय्यक पोलीस निरिक्षक सावळे, हेकॉ घाटे, हेकॉ रजिक शेख, हेकॉ पालवे, नापोकॉ संदीप जाधव यांनी केली आहे .

ग्रंथालयांना अर्थसहाय्य पाहिजे का ? 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा Should Libraries Be Funded? Apply by November 30

सन 2021, 2022 व 2023 नुकसानीची भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली का?

हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक नमुद करावा (The PAN number should be mentioned along with the signature on the life certificate)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें