बुलढाणा जिल्हयातील प्रत्येक गावातून जाणार कलश दर्शन रथयात्रा
बुलढाणा न्यूज – भारताची ललाटरेषा बदलणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक धाड नगरीत उभे राहत आहे. या स्मारकाच्या पायाभरणीत सिंदखेडराजा, किल्ले शिवनेरी, रायरेश्वर आणि किल्ले रायगडावरील पवित्र माती आणि जल चा वापर करण्यात येणार आहे. माती आणि जल आणण्यासाठी छत्रपती शिव-शंभू स्मारक समितीचे पदाधिकारी व शिवभक्त रविवार, 5 नोव्हेंबर 2023 रोजी रवाना होत आहे. या माती आणि जल चे पंचक्रोशीतील नागरिकांना दर्शन व्हावे, म्हणून कलश दर्शन रथयात्रा देखील काढण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांनी वयाच्या केवळ 16 व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून दिले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले .
या स्मारकाच्या पायाभरणीत राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर व हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील पवित्र माती आणि जल चा वापर करण्यात येणार असल्याचे पवित्र माती आणि जल आणण्यासाठी छत्रपती शिव-शंभू स्मारक समितीचे पदाधिकारी व शिवभक्त आज रविवार, 5 नोव्हेंबर 2023 रोजी रवाना होणार आहे.
पायाभरणीत प्रत्येक गावातील माती
मातृतिर्थ सिंदखेड राजा, किल्ले शिवनेरी, रायरेश्वर व किल्ले रायगडवरील पवित्र माती आणि जल असलेले मंगल कलश धाड परिसरातील दाखल झाल्यानंतर प्रत्येक गावातून मंगल कलश दर्शन रथयात्रा काढण्यात येणार आहे. कलश रथयात्रा जात असलेल्या प्रत्येक गावातील माती संकलीत करुन ती देखील शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती दिली.
वैभवराजे मोहिते
अध्यक्ष , छत्रपती शिव-शंभू स्मारक समितीhttps://buldhananews.com/1539/