A gang of loose dogs attack Rohi’s puppy
बालाजी मंदिर परिसरातील घटना
बुलढाणा न्यूज – आज 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी मॉर्निंग ग्रुप, बुलढाणाचे सदस्य नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बालाजी मंदिर परिसरात गेलो असता. तेथे एक रोही त्याच्या छोटयाश्या पिल्ला सोबत खेळत असतांना अचानक काही 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी त्या पिल्लावर हल्ला केला. ते पिल्लू जोरजोरात ओरडत होते. त्याची पिल्ला आई सुद्धा ओरडत होती. अस वाटत होत की ती मदतीला हाक मारत असेल
आवाज एकताच मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आवाजाच्या दिशेने धावलो तिथे कुत्र्यांनी त्या पिल्लाला पकडले होते त्या मोकाट कुत्र्यांच्या तावडीतुन त्या पिल्लाला सोडविले आणि त्याला उचलून आणले पाणी पाजले. तात्काळ वन अधिकारी ठाकरे साहेब यांना फोन करुन वन विभागाची गाड़ी आणि योग्य तो औषध उपचार करण्यासाठी विनंती केली. ठाकरे साहेबांनी सुद्धा लागलीच तत्परता दाखवून वन विभागाची गाड़ी आणि कर्मचारी घटनास्थळी पाठवले आणि त्या जखमी पिल्लाला सोबत घेऊन गेले.
यांच्या मिळाले रोहीच्या पिल्लाला जीवनदान
यावेळी मॉर्निंग ग्रुप, बुलढाणाचे सदस्य तथा पर्यावरण मित्र प्रदिप डांगे, नितिन राऊत, प्रदिप हिंगणे, अनु माकोने, नंदकिशोर पाटील, सौदलकर, सुरडकर, वराडे, सावळे, बुलढाणा नगर परिषदचे अहीर, गणेश सरोदे तसेच बालाजी मंदिर मधील जाधव काका उपस्थित होते.
सन 2021, 2022 व 2023 नुकसानीची भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली का?