मन आणि मनगट मजबुत करण्याचे काम संघ शाखेतच केले जाते – सुहास कुळकर्णी

The work of strengthening the mind and wrists is done in the Sangh branch itself - Suhas Kulkarni

The work of strengthening the mind and wrists is done in the Sangh branch itself – Suhas Kulkarni
पिंपळगाव सराई संघ शाखेचा विजया दशमी उत्सव सपन्न

             पिंपळगाव सराई www.buldhananews.com– उत्सवाचे प्रमुख वक्ता सुहास कुळकर्णी यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून संघ म्हणजे चारित्र्यवान आणि देशभक्त नागरीक घडविण्याचे केंद्र आहे तसेच मन आणि मनगट मजबुत करण्याचे काम संघ शाखेतच केले जाते. ते सोमवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पिंपळगाव सराई शाखेचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव प्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम जनता विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
        The work of strengthening the mind and wrists is done in the Sangh branch itself - Suhas Kulkarni

          या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रमेश देशमाने व उत्सवाचे प्रमुख वक्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुलढाणा जिल्हा व्यवसायीकार्य प्रमुख सुहास कुळकर्णी यांनी शस्त्रपूजन करुन उत्सवाची सुरुवात केली. यामध्ये तरुण व बाल स्वयंसेवकांनी व्यायाम योग , दंड योग सामुहीक योगासने असे विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर सुभाषीत अमृत वचन, सांघीक गीत व वैयक्तिक गीत सादर करण्यात आली

The work of strengthening the mind and wrists is done in the Sangh branch itself - Suhas Kulkarni

. त्यानंतर प्रमुख अतिथी रमेश देशमाने यांचे स्वागत करुन त्यांनी मार्गदर्शन केले.

        आपल्या देशाला समृध्दतेचा वारसा लाभलेला आहे आणि या उत्सवाला धाड तालुका कार्यवाह सुदाम चंद्रे, धाड तालुका सहकार्यवाह संजय जोशी, पिंपळगाव सराई संघ शाखेचे मुख्य शिक्षक राजेंद्र वायाळ, तसेच संघाचे पदाधिकारी परीसरातील माता भगिनी व प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 

 

जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी व संपादक रमेश खंडारे सन्मानित

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी शिबिराचे आयोजन

राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी आज घेणार अग्निवीर अक्षय यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें