डोळ्यात मिर्चीपूड फेकणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

The accused who threw chilli powder in the eyes are in the custody of the police

The accused who threw chilli powder in the eyes are in the custody of the police

पोलीसांनी केला दोघां आरोपींकडून 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

          बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – किराणा मालाची वसुली करून जळगांव जामोद वरुन मलकापूर येथे जात असताना गाडी येरळी पुलाजवळ अडवून डोळ्यात मिर्चीपूड टाकून गाडीतील बॅगसह 3 लाख 78 हजाराचा रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित दोन आरोपींच्या ताब्यातून 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना पुढीस तपास कामी नांदुरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

The accused who threw chilli powder in the eyes are in the custody of the police
          ही कारवाई बुलढाणा जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री.अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे सर यांचे आदेशानेे नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शनिवार, दि.28 ऑक्टोंबर 2023 रोजी जबरी चोरीचे गुन्ह्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांचेकडून 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी यांना नांदुरा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

तपास यांनी केला

सहाय्यक पोलीस निरिक्षक नंदकिशोर काळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रामविजय राजपुत, हेकॉ.एजाज खान, नापोकॉ पुरूषोत्तम आघाव, पोकॉ विक्रांत इंगळे, तांत्रिक हेकॉ राजु आडवे, चालक पोकॉ राहुल बोर्डे यांच्या पथकाने केली.

गुन्हयात मिळालेला माल असा

रोख रक्कम 1 लाख 60 हजार रुपये
एक मोबाईल किंमत 15 हजार रुपये

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें