वैभव मोहिते यांच्या निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता
बुलढाणा न्यूज – दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, मंत्री दर्जा हे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार, श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता श्रीमती ताराबाई शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित दिव्यांग कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगासंबंधीत राबविण्यात येणार्या विविध योजनांचा अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे प्रहार पदाधिकार्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता वैभव मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देतील.
ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक
माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील आवाहन