It is not the time of pregnancy but the need of the baby
प्राचीन काळापासून गर्भ संस्काराला अनन्यसाधारण महत्व सांगितले जाते आहे पण दुर्दैवाने असे होते, कि ज्या वयात बाळाच्या बुद्धीमत्तेकडे लक्ष देण्याची गरज असते त्या वयात न देता, वय निघून गेल्या नंतर बाळाच्या बुद्धिमत्ता वाढी साठी पालक प्रत्यन्न करतात.
तुम्हाला हे माहिती आहे का?
गर्भावस्थेच्या सहाव्या आठवड्यापासून बाळाचा मेंदु विकासीत होत असतो आणि जन्मा पर्यंत 80% मेंदुचा विकास हा झालेला असतो. आजही अनेकांना गर्भ संस्काराचे महत्व कळालेच नसून ज्या प्रमाणे मडके बनविण्यासाठी उत्तम माती चक्का, पाणी , अग्नि आणि कुंभाराची गरज असते तसेच उत्तम गर्भ धारणे साठी उत्तम बीज, ऋतु क्षेत्र, अंबुची गरज असते, त्यासाठी बीज संस्कार हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच संतती प्राप्तीची इच्छा असणार्या दांपत्यांनी बीज संस्कार करून घ्यावे ; तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! कारण जेवढे शुद्ध बीज तेव्हढेच उत्तम फळ, गर्भ संस्कार हे आयुर्वेदाने दिलेले वरदान आहे, त्याचा वापर सुदृद्ध, निरोगी, सर्वगुणसंपन्न संतती प्राप्ती साठी उपयोगी ठरते. गर्भ संस्कार हे एका दिवसात होत नसुन संपुर्ण गर्भ अवस्थेत करण्याचे कार्य आहे.
गर्भधारणे नंतर गर्भ संस्कार प्रक्रीयेला सुरवात होते. त्यात सर्व प्रथम गर्भिणी परिचर्या म्हणजे गर्भिणीने पाळावयाचे शास्त्रोक्त नियम. तसेच ज्या महिन्यात अवयवाची वाढ होते. त्या प्रमाणे काढे, वटी इत्यादी दिले जाते. तसेच विविध अॅक्टिविटी करून घेतल्या जातात.या शिवाय सत्विक आहार,योगा, मेडिटेश या सर्वांचा समावेश गर्भ संस्कारामध्ये होते. या साठी तज्ञान कडूनच हे करून घ्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर याचे खुप व्हिडिओ आहेत परंतु त्यात बर्यापैकी अर्धवट व चुकिची माहीती असते त्यामुळे स्वतःची सद्विवेक बुद्धीचा वापर करून या गोष्टीचे पालन करावे.प्रत्येक गर्भिणीची अवस्था, प्रकृती ही वेगवेगळी असते,म्हणून तज्ञाचा सल्ला घ्यावा.
तुम्हाला पण, तुमचे बाळ हे सर्वगुणसंपन्न बुद्धिमान, तेजस्वी हवे असेल तर गर्भ संस्कार Garbha Sanskar नक्की करावे. तुम्हाला हवे असलेले अनेक गुण तुम्ही बाळा मध्ये रुजवू शकता. बाळाची हवी तशी रेखाटनी करू शकता, हे पूर्ण शक्य आहे. जेव्हा बाळ गर्भात वाढत असत. बाळा मध्ये असलेले दोष सुध्दा तुम्ही ह्या अवस्थेतच दुर करू शकता. उत्कृष्ट बाळ हवं असेल तर आधी उत्कृष्ट पालक बनणे गरजेचे आजच्या काळात दिसून येत आहे. म्हणूनच सर्वगुणसंपन्न बाळाची इच्छा असणार्या पालकांनी गर्भधारणे पूर्वीच तसा विचार कारणे आवश्यक आहे.
– डॉ.कल्याणी सुरज पाटील
गर्भ संस्कार
आरोह गर्भ संस्कार केंद्र,बुलडाणा. 8669405520