जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलढाणा न्यूज- बुलढाणा जिल्ह्यातील आशा वर्कर्स ह्या अत्यंत अल्प मोबदल्यावर स्वयंसेविका म्हणून तर गटप्रवर्तक ह्या त्यांचे कामाचे सुपरव्हिजन म्हणून आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महत्वाची कामे करतात. त्यांना शासकीय कर्मचार्यां प्रमाणे कुठलीही सोईसुविधा मिळत नाही.परंतू कोणतेही जबाबदारीची कामे मात्र शासकिय कर्मचार्यांच्या बरोबरीने त्यांच्या कडून करून घेतल्या जातात. शासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचे मोबाईल आणि त्यासाठी लागणारे रिचार्जची व्यवस्था केलेली नसताना सुद्धा त्यांना ऑनलाईन कामाची सक्ती आरोग्य प्रशासनाकडून केल्या जात आहे. आरोग्य प्रशासनाने कुठल्याही प्रकारची ऑनलाईन कामाची सक्ती आशा व गटप्रवर्तकांना करू नये.अन्यथा या विरोधात संघटना संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.या पूर्वी सुद्धा तालुका पातळीवर या विरोधात लेखी निवेदने आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. वारंवार सांगून सुद्धा प्रशासन ऐकत नसेल तर संघटने जवळ बहिष्कारा शिवाय पर्याय नाही अशी तंबी या आंदोलनातून देण्यात येणार आहे. बीन पगारी अन फुलं अधिकारी अशी अवस्था आज आशा व गटप्रवर्तकांची झाली आहे. त्यांचा वापर केवळ वेठबिगारी म्हणून केल्या जात आहे.सरकारने नुकत्याच कंत्राटी कर्मचार्यांच्या बाबत समायोजनाचा जो निर्णय घेतला त्या प्रमाणे गटप्रवर्तकांचे सुद्धा कायम सेवेत समायोजन करावे,आशा वर्कर्सला किमान 21 हजार रूपये वेतन लागू करावे.कोरोना काळात ज्या पद्धतीने ह्या महिलांनी आपला जिव धोक्यात घालून जी कामे केली त्याची सरकारने जाणीव ठेवून दरवर्षी दिवाळी बोनस म्हणून 5 हजार रूपये त्यांना देण्यात यावे.पंतप्रधान मातृत्व योजना, NCD च्या कामाचा मोबदला सरसकट सर्वच आशा व गटप्रवर्तकांना देण्यात यावा, कुठलेही मोफत काम त्यांच्या कडून करून घेण्यात येऊ नये या व इतर अनेक स्थानिक पातळीवरील मागण्या घेऊन सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतत्वात मंगळवार, दि.3 ऑक्टोबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा (Protest in front of Zilla Parishad) समोर संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव सुरेखा पवार, उपाध्यक्ष रश्मीताई दुबे,ललिता बोदडे, जयश्री तायडे,स्वाती वायाळ,कविता चव्हाण,वर्षा शेळके, गंगा अंभोरे,सुलोचना गाडेकर, संगीता लोखंडे,अलका राजपूत, सोनाली बोरबळे, दिपाली वळसे,मंदा मसाळ,सीमा उमाळे,राजेश्री नेमाडे,ललिता भगत,शोभा बगाडे, रूपाली गावंडे, प्रतिभा बानाईत,उषा पडोळ,सीमा शेळके,सीमा सोळंके,सरिता म्हस्के,शोभा मोतेकर, स्वाती पांडे,निर्मला मघाडे इत्यादींसह संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी केले आहे.