पुतण्याच्या तक्रारीवरुन टिप्पर चालकावर गुन्हा दाखल

पोलीसांकडून टिप्पर चालक आरोपीचा शोध घेणे सुरु

बुलढाणा न्यूज – बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई ते सैलानी रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालून मोटर सायकलला भरधाव वेगाने येणार्‍या मिक्सर टिप्पर चालवणार्‍या ने उडविले होते. ह्यामध्ये मोटार सायकल चालक जागेवरच मृत्यू झाला होता. तर त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी मृतकाच्या पुतण्याच्या तक्रारीवरुन शुक्रवार, दि.29 सप्टेंबर रोजी रायपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार, दि.29 सप्टेंबर रोजी पिंपळगाव सराई सैलानी रस्त्यावर मारुती मंदिराजवळ एम.एच.28 बीबी 2206 या क्रमांकाचे मिक्सर टिप्परने मोटर सायकलला जबर धडक दिली होती. यात मोटार सायकल चालकाच संजय हाडे वय 50 हे जागेवरच ठार झाले होते. तर त्यांची पत्नी रंजना संजय हाडे यांचा हात तुटून गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. हे दोघे रा.मोहगाव हाडे तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे सैलानी येथून दर्शन घेवून जात होते. यावेळी हा अपघात झाला होता. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनला शुक्रवार, दि.29 सप्टेंबर रोजी मृतकाचा पुतण्या अंकुश हाडे यांच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस स्टेशनला चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावर अपघात, मोटार सायकल चालक ठार तर पत्नी जखमी

पुढील तपास रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शकाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश सावळे, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पालवे तपास करीत आहेत. अद्याप पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें