रसिक श्रोत्यांना उपस्थित राहाण्याचे आवाहन
बुलढाणा न्यूज- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करित असतांना आपल्या गुणवत्तेच्या आधारावर नावलौकिक मिळविला आहे. यात जिल्ह्यातील म्हसला येथील मातंग समाजातील कु.संगिता बावस्कर यांनी ग्रंथालय क्षेत्रात संशोधन करित अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून, परिश्रम करत, हाल अपेष्टा सहन करून आचार्य हि प्रतिष्ठेची डॉक्टरेट पदवी उत्कृष्ट गुणांनी संपादन केली आहे. याबद्दल प्रगती वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. त्यांच्या या खडतर प्रवासाची दखल वेगवेगळ्या समाज माध्यमातून घेण्यात आली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठान आणि लेखक श्री.सुभाष किन्होळकर यांचा सुद्धा याच कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.संतोष आंबेकर हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे उपस्थित राहाणार आहेत. तरी बुलढाणेेकर रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कौतुक सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्रगती वाचनालयाच्या तसेच वाचनालयाच्या अध्यक्ष सुजाता कुल्ली, सचिव प्रा.डॉ.कि.वा.वाघ, डॉ.गणेश गायकवाड, पुरूषोत्तम गणगे, मुकुंद पारवे, छायाचित्रकार रविकिरण टाकळकर, प्रा.विनोद देशमुख, पंजाबराव गायकवाड, शोभा पवार, डॉ.विजयाताई काकडे यांनी केले आहे.