बुलढाणा न्यूज – शासनाला लागणार्या सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करणार्या जेम पोर्टलविषयी बुधवार, दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण होणार आहे. शासकीय कार्यालयातील अधिनस्त सर्व विभागातील कार्यालय प्रमुख आणि संबंधितांसाठी सदर प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणास लॅपटॉपसह उपस्थित राहावे लागणार आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या गर्व्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलची कार्यपद्धती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे.
जेम पोर्टलचा वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग आणि स्वायत्त संस्थांना बंधनकारक आहे. उद्योग विभागाच्या सुधारीत खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जेमवरील वस्तू आणि सेवा खरेदीसंदर्भात प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.