आरोपी भोकरदन तालुक्यातील शिरसगांव मंडप येथून ताब्यात
बुलढाणा न्यूज- बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील एका शेताच्या गोठयातून अज्ञात चोरट्याने 4 बकर्या व दोन बोकड असा एकूण सत्तावन्न हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता. ही घटना शनिवार, दि.23 सप्टेंबरच्या रात्री घडली होती. या प्रकरणी रविवार, दि.24 सप्टेंबर रोजी शगीर खा शबीर खा यांच्या फिर्यादीवरुन या अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पोलीसांनी शोध घेत मंगळवार, दि.26 सप्टेंबर रोजी या अज्ञात चोरट्यात भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी शगीर खा शबीर खा यांच्या शेतातील गोठ्यातून शनिवार, दि.23 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चार बकर्या दोन बोकड असा एकूण 57 हजार रुपये किमतीचा माल चोरुन नेला आहे. अशी तक्रार पोलीसात शगीर खा शबीर खान यांनी दिली होती. याप्रकरणी रविवार, दि.24 सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञान चोरट्या विरुद्ध रायपूर पोलीस स्टेशनला कलम 379 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास बुलढाणा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या आदेशाने रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवई, आशिष काकडे, राजीव गव्हाणे, अरुण झाल्टे यांनी परिसरामध्ये योग्य प्रकारे तपास करून भोकरदन पोलिसांच्या मदतीने बकर्या चोरणार्या आरोपीचा शोध घेतला असता.
यामध्ये आरोपी साहिल मुक्तार शहा राहणार शिरसगाव मंडप तालुका भोकरदन याला मंगळवार, दि.26 सप्टेंबर रोजी रोजी ताब्यात घेत रायपूर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी फरार झालेले आहे. बकर्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून बुलढाणा जिल्ह्यातील बकर्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असा विश्वास रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी व्यक्त केला आहे.