ग्रामसेवक संघटना जिल्हा बुलढाणा व बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांची संयुक्त मागणीला यश
बुलढाणा – बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजयभाऊ गायकवाड MLA Sanjay Bhau Gaikwad यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामसेवकांकरिता सुसज्ज असे 1 कोटी रुपयांचे ग्रामसेवक भवन Gramsevak Bhavan buldhana मंजूर करीत असल्याचे जनसंपर्क कार्यालयातील एका बैठकीत जाहीर केले आहे. या घोषणेमुळे जिल्हयातील ग्रामसेवक तसेच पदाधिकार्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीस बुलढाणा जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सचिव देवेंद्र बर्डे, राज्य ग्रामसेवक संघटनेचे माजी सरचिटणीस प्रशांत जामोदे, बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे, ग्रामविकास अधिकारी पदमराव देशमुख, कोथळी ग्रामविकास अधिकारी विजय व्यवहारे आदी ग्रामसेवकांची या बैठकीस उपस्थिती होते. लवकरच बुलढाणा येथे हृया ग्रामसेवक भवनाचे भूमिपूजन ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी व लोकप्रिय आमदार संजयभाऊ गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित राहतील अशी माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. आमदार महोदय संजयभाऊ गायकवाड MLA Sanjay Bhau Gaikwad

यांनी भवनास 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्यामुळे पदाधिकार्याकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.