बुलढाणा- महात्मा जोतिबा फुले ( Mahatma Jotiba Phule) यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजाला आज 150 वर्ष पूर्ण झाले आजच्या या मंगलदिनी Samata Films समता फिल्मस आणी Abhita Films अभिता फिल्मस निर्मित सत्यशोधक चित्रपटाचे ट्रिजर चे प्रसारण करण्यात आलेले आहे. हा चित्रपट महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई यांचे शैक्षणिक कार्य, त्यांचा समाजिक संघर्ष हा सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. आज या चित्रपट ट्रिजर चे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारण झाले आहे.सत्यशोधक या चित्रपट ट्रिजर चे प्रसारण करून या चित्रपटाची भूमिका शहरातच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सामान्य व सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहचली पाहिजे या शुद्ध हेतूने बुलढाणा शहरात या ट्रिजरचे प्रसारण करण्यात आलेले होते.ट्रिजर प्रसारण कार्यक्रमाला डॉ.आशिष खासबागे, जेष्ठ मार्गदर्शक माधवराव हुडेकर, इंजिनिअर सुरेश चौधरी, डॉ.हेमंत मानकर, मिलिंद वानखडे, अॅड. प्रेम खासबागे, अंबादास घेवंदे, अमोल रिंढे, गजानन घिरके, श्रीमती.स्नेहलता मानकर, डॉ.वर्षा खासबागे, डॉ.सौ.मानकर, सौ.सुचेता खासबागे, सुनील गोरे, आशिष गायके, आर्यन खासबागे आदींची उपस्थिती होती.